वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अनिल देशमुखांवर कोणा शत्रूने नव्हे, तर एकेकाळी त्यांच्याच उजवा हात मानला गेलेल्या व्यक्तीने आरोप लावलेत, असे कठोर निरीक्षण न्यायमूर्ती कौल यांनी अनिल देशमुख आणि ठाकरे – पवार सरकार यांच्या याचिकांवर सुनावणी करताना नोंदविले आहे.Anil Deshmukh enemy, who made the allegations against you but it was done by the one who was almost your right-hand man (Param Bir Singh), Supreme Court Justice Kaul observed
अनिल देशमुखांच्या वतीने ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रिम कोर्टात बाजू मांडली. ते म्हणाले, की अनिल देशमुखांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय प्राथमिक चौकशी देखील होऊ शकत नाही.
कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात कुठे तरी काही तरी बाहेर ऐकलेल्या गप्पांच्या आधारे काही आरोप केले, तर त्याची चौकशी होऊ शकत नाही. कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. पोलीस आयुक्तांनी काही सांगितले तर तो काही पुरावा होऊ शकत नाही.
याला न्यायमूर्ती कौल यांनी खणखणीत उत्तर दिले. ते म्हणाले, अनिल देशमुखांवर त्यांच्या कोणा शत्रूने आरोप केलेले नाहीत. तर एकेकाळी त्यांचाच उजवा हात मानला गेलेल्या व्यक्तीने केलेले आहेत. १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात महाराष्ट्रातले बडे अधिकारी गुंतलेले आहेत.
त्यामुळे सीबीआयचा तपास आणि चौकशी दोघांची म्हणजे आरोप करणाऱ्याची आणि आरोपीची झाली पाहिजे.असे कठोर निरीक्षण नोंदवून सुप्रिम कोर्टाने अनिल देशमुख आणि ठाकरे – पवार सरकार या दोन्हींच्या सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळून लावल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App