विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या बडे नेत्यांना खोट्या आरोपाखाली गुंतवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी धमकावल्याचा आरोप अनिल देशमुख आणि श्याम मानव यांनी केला होता, प्रत्यक्षात अनिल देशमुख यांनीच गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anil Deshmukh claims that Fadnavis threatened him
पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जळगावचे तत्कालिन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी आपल्याला अनिल देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले प्रवीण मुंढे?
विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांनी मला फोन केला. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येऊन ब्रीफ करतील. त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबद्दल सांगितले. अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा, असे चव्हाण यांनी सांगितले’, असे प्रवीण मुंढे म्हणाले.
त्यावर मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जायला सांगितले. कारण ते सांगत असलेला घटनाक्रम जळगाव हद्दीत नव्हता. पण तसे करण्यास तक्रारदाराने नकार दिला. पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असे सांगितले, त्यावेळी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांचा फोन यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी, आयजी कायदा-सुव्यवस्था, पोलीस महासंचालक यांना सांगितला, असे प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले.
पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला, यावेळी तर त्यांनी मला धमकावले. एका एफआयआरसाठी तीन वेळा फोन का करावा लागतो??, अशी त्यांनी मला विचारणा केली. सातत्याने स्वतः गृहमंत्रीच धमकावत असल्याने अखेर मी गुन्हा दाखल केला. कोणतीही घाई नसताना झिरो एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला. शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता’, असे प्रवीण मुंढे यांनी सांगितल्याचे सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रवीण मुंढे यांचा स्पष्ट खुलासा आणि त्यावर सीबीआयचा अहवाल यामुळे अनिल देशमुख पूर्ण एक्सपोज झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App