विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने अमृता फडणवीसन विषयी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला असून सगळीकडून तिचा निषेध करण्यात येत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अंजली भारती हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विषयी अतिशय गलिच्छ वक्तव्य केले. बलात्काराचे समर्थन केले. अंजली भारतीचा हा व्हिडिओ सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात तिच्या गलिच्छ वक्तव्याविरोधात प्रचंड संताप उसळला.
श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते… pic.twitter.com/qaipTJLw97 — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 27, 2026
श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?
हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे.
पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते… pic.twitter.com/qaipTJLw97
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 27, 2026
भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि मुंबई महापालिकेतल्या ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंजली भारती हिच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करायची मागणी केली. देशातल्या कुठल्याही व्यक्तीशी राजकीय मतभेद असू शकतात त्याविषयी कोणी बोलू पण शकते.
परंतु, बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभे राहून अंजली भारती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची भाषा वापरते. अंजली भारती हिच्या बुद्धीची कींव करावी तेवढी थोडी आहे. तिच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे वक्तव्य चित्रा वाघ आणि किशोरी पेडणेकर यांनी केले. अंजली भारतीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड पडसाद उमटले. सगळीकडून तिच्या वक्तव्याचा प्रचंड निषेध झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App