प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच मोठा राजकीय रंग भरला आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऋतुजा लटकेंची उमेदवारी जाहीर केली असली तरी त्या महापालिकेच्या तृतीय श्रेणी कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मुद्दा अधांतरी लटकला आहे. Andheri east bypoll : both Shivsena factions locks horn over rutuja latke’s candidature
ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याच्या बातम्या आहेत. ऋतुजा लटके यांना मधल्या मध्ये बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाजूला काढून त्यांनाच उमेदवारी देणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला राजकीय फाऊल करणार अशा या बातम्या आहेत.
shivsena : “भूतकाळ” विसरून “वर्तमान” गमावले, झाले मोकळे आकाश म्हणत “भविष्या”चे दिवास्वप्न पाहिले!!
मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एडवोकेट अनिल परब हे मैदानात आले असून त्यांनी ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीसाठी हायकोर्टात जाण्याची तयारी दाखविली आहे. मुंबई महापालिकेतील अधिकारी केवळ तांत्रिक कारणामुळे ऋतुजा लटकेंचा राजीनामा अडवून ठेवत आहेत. तो मंजूर करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर खुद्द ऋतुजा लटके यांच्या मनात नेमके काय आहे??, हे अद्याप बाहेर आलेले नाही. त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जास्त ऍक्टिव्ह झाला असला बाकी कोणताच राजकीय पक्ष त्यावर उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. शिवाय भाजपने देखील मुरजी पटेल यांची उमेदवारी अजून अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. अद्याप ऋतुजा लटके देखील उघडपणे समोर येऊन काहीही बोललेल्या नाहीत. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर हायकोर्टात दहाव्याला तयार असले तरी खुद्द त्या स्वतः नेमके काय करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App