म्हणून अनंत करमुसे यांना बेदम मारहाण, शरद पवार यांना शरदुद्दीन आणि आव्हाड यांचा जितुद्दीन म्हणून उल्लेख

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार यांना शरदुद्दीन आणि जीतेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन म्हणून उल्लेख फेसबुकवर केल्याने चिडून अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. आव्हाड यांचा नग्न फोटोही त्याने पोस्ट केला होता. Anant Karamuse described Sharad Pawar as Sharaduddin and Awhad as Jituddin on facebook, thats why Ncp bitted him

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ज्या अनंत करमुसे अभियंत्याला बेदम मारहाण प्रकरणी अटक आणि त्यानंतर जामिनावर मुक्तता झाली. शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष असलेल्या अनंत करमुसे याने २०२० साली फेसबुकसह सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांचे अर्धनग्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौलवीच्या रुपातील फोटो अपलोड केलेले होते.



त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करमुसेला मारहाण केली होती. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांना गुरूवारी अटक झाली. अनंत करमुसे याने यापूर्वी २०१७-१८ मध्ये फेसबुकवरून शरद पवार यांचा शरदुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन या नावाने उल्लेख करत ट्रोल केले होते. २०१८ पर्यंत तो आव्हाड यांना सातत्याने ट्रोल करीत होता. २०१८ मध्ये आव्हाडांनी त्याला ट्विटरवरून ब्लॉक केले.

त्यानंतरही तो फेसबुकवरून आव्हाडांना ट्रोल करत होता, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितिन देशमुख यांनी सांगितले. २०२० मध्ये आव्हाडांचा नग्न फोटोही फेसबुकवर टाकला. पवारसाहेब आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचेही मौलवीच्या रुपातील फोटोही अपलोड त्यांने केले. यामुळे कार्यकर्त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी करमुसेला मारहाण केली होती. या पोस्ट बघितल्यावर कुणालाही रागच आला असता असेही देशमुख म्हणाले

Anant Karamuse described Sharad Pawar as Sharaduddin and Awhad as Jituddin on facebook, thats why Ncp bitted him

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात