‘’आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’’ तर्फे महिला आणि मुलींसाठी तीन मोफत कोर्सेसचा शुभारंभ

शहरातील नामवंत प्लास्टिक सर्जन डॉ. उज्वला दहिफळे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : आनंदी एम्पॉवर फाउंडेशन ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून मागील वर्षभरात संस्थेकडून महिला व मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षण, शोभेच्या वस्तू बनवणे व त्यासाठी मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी मोफत प्रदर्शन इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आता संस्थेच्यावतीने महिला व मुलींसाठी मोफत तीन प्रकारचे कोर्स सुरू करण्यात आले आहेत. Anandi Empower Foundation launched three free courses for women and girls

आनंदी एम्पॉवर फाउंडेशन ही संस्था छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर व भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव  विजयाताई रहाटकर यांच्या प्रेरणेतून उभी राहिली आहे. विजयाताई या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा आहेत. १५ जून २०२३ रोजी Smart Excel, Tally आणि Basic Beautician कोर्सेससाठी मोफत प्रवेश देणे सुरू झाले आहे. या तीनही कोर्सेसचा शुभारंभ छञपती संभाजीनगर शहरातील प्रथितयश प्लास्टिक सर्जन डॉ उज्वला दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

याप्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा पारितोषक देऊन गौरव करण्यात आला. तसेच Digital marketing आणि web Designing हे कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रही देण्यात आले. यावेळी आनंदी empower foundation मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थिनी नम्रता भारस्वडकर व रोशनी भन्साळी या दोन विद्यार्थिनींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी विद्यार्थिनींना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. विभावरी भालेराव, मिताली धुमाळ, कविता ताई सप्रे , भाग्यश्री गोजरेकर आणि सर्व प्रशिक्षणार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Anandi Empower Foundation launched three free courses for women and girls

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात