प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरुन दिलेला अल्टीमेटम 3 मे मंगळवारी संपला. त्यानंतर बुधवारी 4 मे पहाटेपासून मनसैनिक आक्रमक झाले. ज्या ज्या शहरांमध्ये मशिदींमधून अजानचा आवाज भोंग्यावरुन ऐकू येत आहे, त्या त्या ठिकाणी मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालिसाचे पठण करायला सुरुवात केली आहे. An ultimatum was issued on May 3 at a meeting in Aurangabad
मुंबईतील अनेक भांगात मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केले. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
– येथे भोंग्यांवर हनुमान चालिसा पठण
मुंबई, नवी मुंबई तसेच नाशिक या भागात अनेक मशिदींसमोर मनसैनिकांनी भोंग्यांवरुन हनुमान चालिसा पठण केले. सध्या या ठिकाणांहून अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. ठाणे, मुंबई चारकोप आणि जळगाव येथेही मनसैनिकांनी भोंग्यावरून हनुमान चालिसेचे पठण केले.
जळगावमध्ये हनुमान चालिसा
बुलढाण्यातील खामगाव शहरातल्या चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी भोंगे ताब्यात घेतले, तर जळगाव जामोदमध्ये पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण केले. जळगाव शहरातील भिल्पुरा पोलीस चौकीजवळ असलेल्या शनी मंदिर परिसरात मंगळवारी हनुमान चालीसा लावण्यासाठी आवाजाची चाचणी घेताना, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावल्या होत्या.
हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला
नाशिकमध्ये मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुने नाशिक परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी भोंगे जप्त केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App