पायथ्यापासून सिंहगडासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करणार ; अजित पवार यांची घोषणा

वृत्तसंस्था

पुणे : पायथ्यापासून सिंहगडावर जाण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करणार आहे. तसेच ज्येष्ठासाठी रोप वे तयार केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
An environmentally friendly electric bus facility will be started to reach the fort from the foothills of sinhagad :Ajit pawar

‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ या उपक्रमाची सुरुवात करताना ते बोलत होते. सिंहगडासंदर्भात पर्यटनाच्या मुद्यावर विविध विषयावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.अजित पवार म्हणाले, पर्यटकांना सिंहगडाच्या इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा, हा दृष्टीकोन समोर ठेवून विकास करण्यात येईल.



मराठी व हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून वन विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल.राज्यासह पुण्यातून सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होते. पायथ्यापासून गडावर येण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात येतील.

तसेच जेष्ठ नागरिकांनाही गडावर जाता यावे, यासाठी रोप वे निर्मिताचा विचार सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल. स्थानिकांना प्राधान्य देवून स्टॉल देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

 

वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ

वन्यजीव सप्ताहाचा तसेच गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला. “माझा सिंहगड माझा अभियान” अंतर्गत पुणे वन विभागामार्फत सेल्फी पॉईंट, गाईड ट्रेनिंग, प्लास्टिक बंदी, वन विभाग व पीएमपीच्या माध्यमातून ई व्हेइकल सुरु करण्यात येणार आहे. याबाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले.

पवार यांनी प्रस्तावित फूड स्टॉलची जागा, हवा पॉइंट, विश्रामगृह,वन विश्रामगृह येथे भेट देवून पाहणी केली. उपवनसंरक्षक पाटील यांनी ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

An environmentally friendly electric bus facility will be started to reach the fort from the foothills of sinhagad :Ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात