विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. यासंबंधीचा वाद वाढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली आहे.Amol Mitkari
या संदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले की, ‘सोलापूर घटने संदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भुमिका होती. आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.’Amol Mitkari
https://t.co/SpcuYu15aV — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2024
https://t.co/SpcuYu15aV
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2024
आयोगाला पत्र लिहित केली होती चौकशीची मागणी
अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करणारे पत्र आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिले होते. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या या नात्याने, मी तुम्हाला विनंती करतो की अंजना कृष्णा आयपीएस यांनी सादर केलेल्या ओळखपत्र, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी एक शंका उपस्थित करण्यात आली आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की याची सविस्तर चौकशी करून, त्याची सत्यता सुनिश्चित करावी आणि संबंधित विभागांची योग्य माहिती प्रदान करावी, असे या पत्रात म्हटले होते.
अजित पवार यांनीही दिले होते स्पष्टिकरण
अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App