• Download App
    ‘’… यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे’’ अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप! Amit Thackerays reaction to the incident of rape and murder of a young woman in a hostel at the Marine Drive area of Mumbai

    ‘’… यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे’’ अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप!

    जाणून घ्या  नेमकं काय आहे प्रकरण आणि अमित ठाकरेंनी काय मागणी केली आहे?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईमधील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका वसतिगृहात  १८ वर्षीय  तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याच वसतिगृहातील सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केलं असून, नंतर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेवर आणि शहरातील कायदा,सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. Amit Thackerays reaction to the incident of rape and murder of a young woman in a hostel at the Marine Drive area of Mumbai

    अमित ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईंमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार-खून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.’’

    याशिवाय ‘’आज हजारो तरुणी आपल्या शहर-गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण-नोकरीसाठी हॉस्टेलमध्ये राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही.’’ असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

    याचबरोबर, ‘’राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ करावे.” अशी मागणी मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    विशेष म्हणजे ज्या मुलीची हत्या करण्यात आली आहे त्या मुलीने या प्रकरणातील आरोपी तिची छेडछाड करतोय अशी माहिती दिली होती. पण तशी आपल्याकडे तक्रार केली नसल्याची माहिती हॉस्टेलच्या वॉर्डनने दिली आहे.

    Amit Thackerays reaction to the incident of rape and murder of a young woman in a hostel at the Marine Drive area of Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल