प्रतिनिधी
मुंबई : Amit Thackeray विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.Amit Thackeray
ईव्हीएममुळे मते गायब- राज
३० जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यात ईव्हीएमविषयी ते म्हणाले होते की, कल्याणमधील आपल्या उमेदवाराला त्याच्याच गावात एकही मत मिळाले नाही. हे कसे काय झाले? लोकांनी आपल्याला मते दिली. पण ती गायब झाली.
अमित ठाकरे यांच्या मताचा आदर करायला हवा – संजय राऊत
या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांच्या मताचा आदर करायला हवा, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएम संशय नक्कीच आहे. ईव्हीएम हॅक केले जाते अशा प्रकारचे प्रेझेंटेशन देखील केले गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींना बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सांगितले आहे. जगभरातून ईव्हीएम हे संशयामुळे काढून टाकण्यात आले आहे. मात्र प्रत्येक वेळी ईव्हीएमला दोष देणे योग्य नाही. केवळ ईव्हीएम मुळे पराभव झाला नाही तर मतदार यादीतील घोटाळे, पैशांचा वापर, दहशत यामुळे देखील विरोधी पक्ष निवडणुका हरला असे मानणारा एक वर्ग आहे. अमित ठाकरे यांना देखील तेच म्हणायचे असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रत्येक वेळी ईव्हीएम वर खापर फोडणे योग्य नाही
अमित ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे ते चिरंजीव असून त्यांचा दादर मधून निवडणुकीत पराभव झाला आहे. ते तरुण नेते आहेत. त्यांची एक विचारधारा आहे. त्यांनी जे मत मांडले त्या मताचा आदर करायला हवा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रत्येक वेळी ईव्हीएम वर खापर फोडणे आणि हरलो असे म्हणणे योग्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App