विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Thackeray कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.Amit Thackeray
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच ही दादागिरी मोडून काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे.Amit Thackeray
अमित ठाकरे यांच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल नव्हता. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले, कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरात वाढलोय, त्यामुळे याला कोर्टात सामोरे जाईन, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, राज ठाकरे यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केले. दहीहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचे अनावरण केले, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने, त्या पुतळ्यावरचे कापड काढून अनावरण केले, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची! असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App