अमित शाहांचा दौरा : मुंबई महापालिकेत भाजपचे टार्गेट 150 !; शिंदे गटाशी आघाडी!

प्रतिनिधी

मुंबई : महापालिका निवडणूक भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. त्याचवेळी अमित शाह यांनी भाजपला मुंबई महापालिकेत 150 जागा निवडून आणण्याचे टार्गेट दिले आहे. हाय प्रोफाईल गणेश दर्शने झाल्यानंतर अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईवर फक्त भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे, असे निर्देश अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी मुंबई महापालिकेत 150 जागांचे टार्गेट भाजपाला दिले आहे. Amit Shah’s visit: BJP target 150 in Mumbai Municipal Corporation

राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र विश्वासघात धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असले पाहिजे, आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचही ते म्हणाले. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं 150 जागांचे टार्गेट असून, खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचे शाह म्हणाले.

अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अमित शाह म्हणाले, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळे काही चालेल पण धोका सहन करू नका, जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2014 मध्ये दोन जागांसाठी शिवसेनेनेच युती तोडली होती, असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. शिवसेनेनेच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे त्यांनी म्हटले.

Amit Shah’s visit: BJP target 150 in Mumbai Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात