विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी पुण्यात दाखल झाले. आज, रविवारी दिवसभर शहा महापालिकेसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.दरम्यान आज सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
त्यानंतर दगडूशेठ गणपतीचा महाअभिषेक करण्यात आला.महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.गणरायाला अभिषेक झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो.आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो.असे मागणे अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले.यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App