विशेष प्रतिनिधी
रायगड : छत्रपती शिवाजींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्रात स्वधर्म स्वभाषा याविषयी जाज्वल्य अभिमान निर्माण केला. या स्वाभिमानाच्या विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच पराभव केला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील मर्यादित ठेवू नका, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज रायगडावर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी निमित्त रायगड मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले रायगड मंडळाचे पदाधिकारी आणि असंख्य शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. amit shah
अमित शाह म्हणाले :
रायगडावर मी भाषण करायला आलो नाही, राजकारण करायला आलो नाही. मी शिवाजी महाराजांच्या विचाराची अनुभूती घ्यायला आलो. मला शिव मुद्रा भेट म्हणून मिळाली. शिवमुद्रा जगासाठी आदर्श आहे. भारतासाठीस आहेच आहे.
आज शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. मी शिवचरित्र वाचलं आहे. जिजाऊ माँ ने केवळ शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही. स्वराज, स्वधर्म आणि भाषेचं पुनरुत्थान करण्याची प्रेरणाही दिली. बालशिवाजीला समग्र देशाला एकत्र आणि स्वतंत्र करण्याचा विचार दिला. तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणाही जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजी महाराजांना दिली. त्यामुळेच मी माँ साहेबांना अभिवादन करत आहे.
मी अनेक वर्षानंतर आलो. सिंहासनाला अभिवादन करताना माझ्या मनातील भाव मी सांगू शकत नाही. ज्याने स्वधर्मासाठी, स्वराज्यासाठी मरण्याची एक जिगविषा निर्माण केली. त्यांच्या सभेत मी आज उभा आहे. मला हे वर्णन शब्दात सांगता येत नाही. अटकपासून कटकपर्यंत आणि तामिळनाडू, गुजरातसमेत सर्व देशाला स्वराज्याचं स्वप्न यशस्वी होताना दिसत होतं.
शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता अंधकारात होती. कुणाच्या मनात स्वराज्याची कल्पनाही येऊ शकत नव्हती. दक्षिणेचंही पतन झालं,. त्यामुळे स्वराज्य आणि स्वधर्माची गोष्ट लोकांना गुन्हा वाटू लागली होती. पण १२ वर्षांचा मुलगा सिंधू पासून कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची शपथ घेतली. मी अनेक नायकांचे जीवन चरित्र वाचले, पण दुर्देम्य इच्छाशक्ती, मोठी रणनीती आणि ही रणनीती यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व लोकांना एकत्र करून त्यांनी अपराजित सैन्य उभारलं. भूतकाळ, वारसा काहीच सोबत नव्हता, तरीही त्यांनी मुगलशाहीला नष्ट केलं. अटकपर्यंत मावळे गेले. कटकपर्यंत गेले. बंगालपर्यंत गेले. दक्षिणेत कर्नाटकापर्यंत गेले. तेव्हा देश आता स्वतंत्र होईल असं लोकांना वाटलं. देश वाचला, भाषा वाचल्या. आज स्वातंत्र्यानंतर आपण जगात मान वरून उभं राहतो.
अलमगीर म्हणवून घेणारा औरंगजेब महाराष्ट्रात पराजित
स्वतःला अलमगीर म्हणणारा औरंगजेब महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात पराजित झाला. त्याची कबर महाराष्ट्रात आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवलं गेलं पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, ही मी हात जोडून विनंती करतो. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे. स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाहीत, तर मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. शिवाजी महाराजांनी हे विचार जगासमोर ठेवले. जेव्हा आक्रमकांनी आपल्यावर सत्ता गाजवली. गुलामीची मानसिकता रोवली तेव्हा शिवाजी महाराजांनी हे जाज्वल्य विचार दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App