विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP’s Amit Satam मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला. BJP’s Amit Satam
उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबई महापालिकेची दयनीय अवस्था झाल्याचे सांगत अमित साटम यांनी एका कवितेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. BJP’s Amit Satam
महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे. ढासळून ती पडता पडता, तुझ्याकडे ती पाहत आहे लचके तोडून दशको दशकी, घायाळ तिला ज्यांनी केले त्या पापांचा हिशोब आता जगाकडे ती मागत आहे.
तू दिलेस ज्यांना निवडून त्यांनी या नगरीला काय दिले? भरून पोतड्या, बंगले बांधून नगरीला या नागविले
या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला लुटणाऱ्यांचा हिशोब जनताच घेईल, असा इशारा दिला आहे.
रस्त्यांच्या नावाखाली २१ हजार कोटींचा चुराडा
मुंबई शहर आणि महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातून सगळ्या मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा आहे. मुंबई शहर आपल्या रस्त्यांसाठी संपूर्ण जगभरात कुप्रसिद्ध आहे. शहरातील रस्ते कसे आहेत, यावरून आपण संबंधित शहराबद्दल मत व्यक्त करत असतो. परंतु, मुंबई शहराच्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ही चर्चा गेली अनेक वर्षांपासून ऐकत आहोत, असे साटम म्हणालेत.
मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना साटम यांनी माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, केवळ गेल्या १० वर्षांत मुंबईतील रस्त्यांवर महानगरपालिकेने २१ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा निधी खर्च होऊनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय असून, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, हेच समजत नाही. या सर्व परिस्थितीला केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
घोटाळ्यांची यादी आणि ‘रिमोट कंट्रोल’चा आरोप
अमित साटम यांनी ठाकरेंच्या कार्यकाळातील विविध घोटाळ्यांचा पाढाच वाचला. यामध्ये खालील प्रकरणांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. १ लाख ४६ कोटींचा मोठा स्कॅम, शिक्षण घोटाळा, पाणी प्रकल्प रद्द करून केलेला घोटाळा, कचऱ्याचा घोटाळा आणि जाहिरात उत्पन्नातील भ्रष्टाचार. मुंबईतील १७०० बार आणि रेस्टॉरंटमधून वसुली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
महालक्ष्मी कोविड सेंटर बिल्डरच्या फायद्यासाठी उभारले गेले, तसेच बॉडी बॅग आणि पीपीई किट खरेदीमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पाकिस्तानच्या पत्रकार फहाद हुसेनने ट्विट करून महाराष्ट्रातील कोविड स्थिती पाकिस्तानपेक्षा वाईट असल्याचे म्हटले होते. महापालिकेची स्टँडिंग कमिटी उद्धव ठाकरेंचीच माणसे ‘रिमोट कंट्रोल’ने चालवत असत, असा दावा अमित साटम यांनी केला.
ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबई पाकिस्तान होईल
अमित साटम यांनी अत्यंत टोकाची टीका करत म्हटले की, जर उद्धव ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबईचे ‘पाकिस्तान’ होईल. “ठाकरेंनी २५ वर्षांत मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे, आम्ही १० कामे दाखवू,” असे आव्हान त्यांनी दिले. आम्ही बीडीडी चाळीत घरे दिली, तर ठाकरेंनी स्वतःसाठी ‘मातोश्री २’ बांधली, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, ठाकरे आता मराठी माणसाचे राहिले नसून ते रशीद मामू, चंगद मुलतानी आणि हारून खान यांचे झाले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
महायुतीचा विजय निश्चित
येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच महापौर होईल आणि मुंबईवर भगवा फडकेल, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रश्नावर त्यांनी विचारले की, त्यांनी निवडणूक का लढवली नाही?. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शिव्या या आपल्याला नसून मराठी माणसाला आहेत, असे उत्तरही त्यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App