विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Deshmukh बेळगाव सीमाप्रश्नावर चर्चा करताना काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “हा सीमाभागाचा प्रश्न असल्याने केवळ राज्यसरकार पुरेसे नाही. केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले. देशमुख यांनी नमूद केले की, सध्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार असून कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. मात्र, दोन्ही राज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत हा प्रश्न निकाली काढण्यास पुढाकार घ्यायला हवा.Amit Deshmukh
देशमुख म्हणाले, “राज्यसरकार आपली भूमिका निश्चितच ठामपणे मांडेल. मात्र, हा वाद सीमा भागाशी संबंधित असल्याने केंद्र सरकारचा हस्तक्षेप अनिवार्य आहे.” या मुद्द्यावर केंद्राने पुढाकार घेत सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सीमा प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार आणि दोन्ही राज्य सरकारांनी एकत्र येऊन संवाद साधत तोडगा काढावा, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
लातूरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही बोलताना देशमुख म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संदर्भातील चौकशी प्रक्रियेत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल, आणि त्यावर आवश्यक ती पावले उचलली जातील.” काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “आमच्या पक्षाचे शिष्टमंडळ शेतकऱ्यांना भेटले असून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. आता याचा पुढील तपास सरकारकडे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App