• Download App
    अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार ; दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती|Ambajogai Municipal Council to investigate malpractices; Chief Minister Eknath Shinde informed about strict action against the culprits

    अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार ; दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

    प्रतिनिधी

    मुंबई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितले.Ambajogai Municipal Council to investigate malpractices; Chief Minister Eknath Shinde informed about strict action against the culprits

    सदस्या नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.



    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांची उपायुक्त नगर प्रशासन यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी सदरच्या कामात प्रशासकीय आणि वित्तीय अनियमितता झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार अंबाजोगाई नगर परिषदेतील गणेश सरोदे आणि अशोक साबळे या दोन वर्ग दोनच्या अधिकारी आणि उदय दीक्षित आणि अजय कस्तुरे या कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी करण्यात येणार आहेत.

    या विभागीय चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत सदस्य प्रशांत बंब यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

    Ambajogai Municipal Council to investigate malpractices; Chief Minister Eknath Shinde informed about strict action against the culprits

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!