विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhagan Bhujbal बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे.Chhagan Bhujbal
भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या धोरणाला विरोध करत विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला दानवे यांनी ‘दुटप्पीपणा’ ठरवले आहे. दानवे यांनी थेट प्रश्न केला की, तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध असेल, तर मग भुजबळ यांनी मंत्रिमंडळात का रहावे? मंत्र्यांचा राग आहे, तर मंत्रिमंडळात का राहावे? मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणे, हा राजकीय दुटप्पीपणा आहे आणि यातून नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखा समोर आला आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.Chhagan Bhujbal
राज्य सरकार तर ‘खेळ’ करत नाही ना?
अंबादास दानवे म्हणाले की, विखे पाटील यांच्यावर टीका करत असतानाच, विखे पाटील विखारी असतील तर तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच दानवे यांनी भुजबळ यांच्या कायदेशीर स्थितीवर बोट ठेवत भाजपवरही निशाणा साधला. सदन घोटाळ्याचे संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यांना भाजपनेच जेलमध्ये टाकले. याच भाजपच्या कृपेने ते (भुजबळ) सध्या जामिनावर आहेत. यावरूनच त्यांनी “जामीन कधीही रद्द होऊ शकतो,असे सूचक विधान केले आणि यामागे राज्य सरकार तर ‘खेळ’ करत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा असेल तर भुजबळांनी तिकडे ढुंकूनही पाहू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
महायुतीमधील गोंधळावर टीका
अंबादास दानवे म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणातूनच मराठी माणूस एकजुटीच्या भूमिकेकडे जात असून, येणाऱ्या दिवाळीच्या सणाला मराठी अस्मिता उजळून निघेल, बीडमधील मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांच्या जुन्या वक्तव्यावरून भुजबळ यांनी त्यांना टार्गेट केल्याबद्दल, विजय वडेट्टीवार आणि भुजबळ खांद्याला खांदा आणि गळ्यात गळा घालून बोलत होते, त्यांना आता ते वाईट वाटत असेल त्याला काय करणार? असे भाष्य करून त्यांनी युतीच्या गोंधळावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App