विशेष प्रतिनिधी
बीड : Dhananjay Munde धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत. वाल्मिक कराड याच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी होत नाही तो पर्यंत मंत्री धनजंय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कायम ठेवला पाहिजे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.Dhananjay Munde
काळे म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा बिहार म्हणून बीडची ओळख त्या निमित्ताने या राज्याच निर्माण झाली आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्त्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येमध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून ज्यांचे नाव समोर येत होत त्यांनी आज आत्मसमर्पण केले. पण आत्मसमर्पण करून प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकारने या गंभीर प्रश्नामध्ये पूर्ण लक्ष देऊन विशेष चौकशी करावी. बीड जिल्हा पूर्व पदावर येईल याचा त्या निमित्ताने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
काळे म्हणाले, बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आज दहशतीमध्ये आहे. या सर्व नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्याची आज नितांत गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गृह खाते आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की लोकांच्या अपेक्षेला आपण खरं ठराल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App