बारावीचा निकाल यंदा घसरला तरी सर्व विभागांमध्ये कोकण विभागाची बाजी, वाचा वैशिष्ट्ये!!

प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. दुपारी 2.00 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

Although the 12th results have fallen this year, Konkan division is the bet among all divisions

निकालाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदा राज्यभरातून तब्बल १14 लाख 57,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षार्थींमध्ये 7 लाख 92,780 विद्यार्थी तर 6 लाख 64,411 विद्यार्थिनी आहेत. 9 विभागीय मंडळांत एकूण 3115 केंद्रांवर परीक्षेसाठी 3 लाख 21,396 कर्मचारी कार्यरत होते. तसेच परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला होता.

निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 91.25 % लागला आहे. गेल्या वर्षीच्या निकालापेक्षा तो 2.57 % कमी आहे.

राज्यात कोकण विभाग अव्वल, अव्वल विभागाचा निकाल 96.01 % इतका लागला आहे.

मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13%  इतका लागला आहे.

निकालात यंदाही मुलींची बाजी

यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी..विद्यार्थिनींचा एकूण निकाल 93.73 % तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 % इतका लागला आहे.

23 विषयांचा निकाल 100 %

एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 % इतका लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

विज्ञान शाखेचा राज्याचा 96.09 % इतका बंपर निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 84.05 % इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 84.05 % लागला आहे.

काय होता गेल्या वर्षीचा निकाल

गेल्या वर्षी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 94.22% इतका होता, तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 98.30 % इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 % होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 90.51 % इतका होता.

Although the 12th results have fallen this year, Konkan division is the bet among all divisions

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात