३० एप्रिल राेजी महाविकास आघाडी आणि डाव्या व पुराेगामी पक्ष संघटनांच्या वतीने अलका टाॅकीज चाैक येथे सदभावना निर्धार सभेचे आयाेजन करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल राेजी महाविकास आघाडी आणि डाव्या व पुराेगामी पक्ष संघटनांच्या वतीने अलका टाॅकीज चाैक येथे सदभावना निर्धार सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. महविकास आघडीलतील विविध पक्षांचे नेते या सभेला हजर राहणार असल्याची माहिती आयाेजकांनी दिली आहे. All party organised sadhbhavna Nirdhar sabha ३० April at alka talkies chowk Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, केंद्र सरकार संसदेत विराेधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे कर उत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा-सुव्यवस्थाबाबतचे अधिकार तसेच नाेकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची जाणीवपूर्वक काेंडी करत आहे.
राजकीय विराेधकांना दहडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जात आहे. राज्यातील जनता केंद्राची ही घटना विराेधी दादगिरी सहन करणार नाही हा निर्धार या सभेतून व्यक्त केला जाणार आहे. महागाई व बेराेजगारी बाबत केंद्र सरकार अपयशी ठरले असून ते महाराष्ट्राची बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
काही राजकीय आणि सुपारीबाज उपटसुंभ महाराष्ट्राची शांतता व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी गेले काही महिने सातत्याने प्रयत्न करत आहे. या राजकीय उपटसुंभ्यांना विराेध करण्यासाठी या निर्धार सभेचे आयाेजन करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App