Akshay Shinde : आधी भर चौकात फाशीची मागणी, पण एन्काऊंटर नंतर बदलापूरच्या नराधमाबद्दल सहानुभूती; विरोधकांच्या भूमिकेवर महाराष्ट्रात संताप!!

Akshay Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Akshay Shinde बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अक्षयच्या आई-वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केले आहेत. आता यावरुन विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला घेतले परंतु त्यातून अक्षय शिंदे विषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे आता सोशल मीडियात विरोधकांच्या भूमिकेवरच ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बदलापुरातल्या नराधमाविषयी तुम्हाला एवढी सहानभूती का असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे. Akshay Shinde encounter with the police

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नेमका हाच मुद्दा उचलून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना टार्गेट केले आहे.

अक्षय शिंदेचा एनकाऊंटर झाल्यानतंर आता पोलिसांवर टीका होत आहे. हे सर्व षडयंत्र आहे. अक्षय शिंदचा ठरवून एन्काऊंटर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता यावर ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश म्हस्के यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. Akshay Shinde


Chief Minister War Room : मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन


नरेश म्हस्के काय म्हणाले?

बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे.

जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं, तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली.

आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली??, असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.

Akshay Shinde encounter with the police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात