मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.Akola: Curfew extended till November 21; Punitive action will be taken if he appears outside after 7 pm
विशेष प्रतिनिधी
अकोला :त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड , अकोला यासह अनेक शहरांत आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, या शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अमरावती येथील तणावपूर्ण स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अकोल्यात निर्माण होऊ नये म्हणून 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात रात्री संचारबंदी घोषित करण्यात आली असून आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra Curfew 2021 : चिंता वाढली! महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, २४ तासांत ६७,१२३ नवे रुग्ण, ४१९ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान आता अकोला शहरात यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. तसेच आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मध्यरात्रीनंतर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा परिसर, महत्वाचे चौक, रस्त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी केली. आजपासून पोलिसांनी नियमात सक्ती केली आहे. तर सायंकाळी 7 वाजेनंतर रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App