नाशिक : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सूचक पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ठामपणे उभे राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.Ajit’s family and the decision of the Nationalist Congress Party!!; Devendra Fadnavis’ important indicative statement!!
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भात त्यांनी उघड शब्दांमध्ये काही सांगितले नाही, पण सूचक शब्दांमध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला होकार भरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज दोन वेळा माझी भेट घेऊन राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धती विषयी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी निर्णय घेऊ, असे सांगितले. अजितदादांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयाच्या पाठीशी सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ठामपणे उभे राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी “अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू”, असे नेमक्या शब्दांमध्ये सांगितल्यामुळे यात शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नाही. शरद पवारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले.
अजित पवारांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जो निर्णय घेतील. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. याचा अर्थ उघड आहे, की राजकीयदृष्ट्या भाजपने अजित पवारांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांच्या कुटुंबापेक्षा वेगळे मानले आणि अजितदादांच्या कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App