प्रतिनिधी
पुणे : शरद पवार श्रींच्या इच्छेनुसार 1978 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. आता अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मातोश्रींनी व्यक्त केली आहे. पण या मातोश्रींचा मुंबईच्या वांद्र्यातील “मातोश्री”शी काहीही संबंध नाही, तर खुद्द अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे, ती देखील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर!!Ajitdada should become Chief Minister; Matoshree’s wish after voting in Katewadi Gram Panchayat election!!
राज्यात आज 2500 ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यात सरपंच थेट मतदानाद्वारे निवडले जाणार आहे. त्यापैकी काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदानही आजच होत आहे. आज सकाळी तिथे मतदान केल्यानंतर आशाताई पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील यावेळी त्यांच्या समवेत होत्या.
आशाताई पवार म्हणाल्या :
लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. आता माझे वय ८६ झाले आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे.
काटेवाडीत विजय निश्चित
काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्या सोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असे आशाताई पवार यांनी सांगितले. मी काटेवाडीत आली तेव्हा गावात काहीच नव्हते. त्यानंतर सूनबाईने गावासाठी काम केले. आता खूप बदल झाले.
अजित पवार करणार नाही मतदान
अजित पवार यांना अशक्तपणा आहे. त्यामुळे ते मतदानास येणार नाही, असे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गावात आमचा विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.
16 जागांसाठी निवडणूक
काटेवाडीत 16 जागांसाठी मतदानाला होत आहे. गावात एकूण 5000 जण मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. यंदा अजित पवार यांच्या पॅनलसमोर भाजपने आव्हान उभे केले आहे. आता त्यात कोण बाजी मारणार? हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. सरपंचपदासाठी दोन्ही पक्षाच्या पॅनलमध्ये थेट निवडणूक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App