जे बॉम्ब फोडणार होते, त्यांनाच विचारा; अजितदादांचा संजय राऊतांना टोला

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. राजकीय बॉम्ब फोडाफोडीची वक्तव्ये केली जात आहेत. विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. Ajitdada pawar advice to Sanjay Raut

अजित पवार म्हणाले की, बाॅम्बस्फोट होणार आहे, असे म्हणणाऱ्यांनाच ते विचारा, तो केव्हा होईल. मी काही असे बोललो नव्हतो म्हणत अजित पवारांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला. तसेच, सीमाभाग केंद्र शासित प्रदेश झाल्यास त्यातून नवे वाद निर्माण होतील. आपली इच्छा असली तरी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना, त्याला केंद्र सरकार मान्यता देणार का? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीतील हवाच काढली आहे.



पुरावे मिळताच सर्वांसमोर मांडणार 

अजित पवार म्हणाले की, राज्यात आज शिंदे- फडणवीस सरकार आहे. या सरकारमध्ये ज्यांच्या कोणाचे प्रकरणे येतील त्यांना तुम्ही वेगळा रंग देऊ नका. विरोधकांकडून फक्त शिंदे मंत्र्यानांच टार्गेट केले जाते, असे चित्र रंगवू नका. विरोधी पक्ष काम करत असताना दुजाभाव करुन चालत नाही. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरी वागणूक द्यायची हे आम्हाला पटत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका मांडताना, ठोस पुरावे असावे लागतात. तेव्हा या संदर्भात पुरावे मिळताच सर्वांपुढे मांडता येतील, असे अजित पवार म्हणाले.

Ajitdada pawar advice to Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात