प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पाठराखण केली आहे. मात्र त्याच वेळी आपल्यावरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांबाबत बोलणे अजितदादांनी टाळले आहे. आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.Ajitdada avoids talking about irrigation scam; Dhananjay Munde’s support!!
सरपंच आणि नगराध्यक्ष यांची थेट जनतेतून निवड करण्यासंदर्भातली विधेयकावर बोलताना धनंजय मुंडे यांनी “एकनाथ” आणि “ऐकनाथ” असा शाब्दिक खेळ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. एकनाथ शिंदे यांनी त्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना मी “एकनाथ”च आहे “ऐक्यनाथ” नाही, असा प्रतिटोला लगावत धनंजय मुंडे यांना तेव्हा देवेंद्रजींनी दया करुणा दाखविली होती परंतु इथून पुढे अशी दया दाखवणे शक्य नाही, असा असे उद्गार काढले होते.
धनंजय मुंडे हे करुणा शर्मा मुंडे प्रकरणात आधीच कायदेशीर आणि राजकीय पातळीवर अडचणीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेमके धनंजय मुंडे यांच्या वर्मावर बोट ठेवल्याने ते अस्वस्थ झाले. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे – करुणा शर्मा प्रकरणाची जोरदार चर्चा असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “करुणा” या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर करुणा शर्मा या काल विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्या. त्याचबरोबर त्यांनी काही लोक आपल्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करत असल्याचे असल्याचा आरोपही केला.
कालच्या या राजकीय वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. कोणीही कोणावर वैयक्तिक आरोप करू नयेत. सार्वजनिक जीवनाची बंधने पाळावीत, असे वक्तव्य अजित पवारांनी केले. पण त्याच वेळी सिंचन घोटाळ्यावरील आरोपांबाबत मात्र काहीही भाष्य करणे अजितदादांनी खुबीने टाळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App