विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मतदारांनी 46% मते देऊन 165 ते 185 जागांची खात्री देऊन शिवसेना भाजपला युतीला कौल दिला आहे. पण अजितदादांनी मात्र वजाबाकीचे गणित मांडून हा कौल नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. झी न्यूजने केलेले सर्वेक्षण सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा विषय ठरले आहे. Ajitdad introduced the mathematics of subtraction
कारण शिवसेना-भाजप युतीला यातून 46% मते तसेच 165 ते 185 जागांचे बहुमत दाखविले आहे. महाविकास आघाडीला 35 % टक्के आणि जास्तीत जास्त 118 जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले आहे. पण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 26 %, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 23 % मतदारांचा कौल आहे आणि नेमक्या याच आकड्यावरून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी वजाबाकीचे गणित मांडले आहे.
मुख्यमंत्र्यांचा 26% सविस्तर आणि उपमुख्यमंत्र्यांचा 23 % टक्के आकडा म्हणजे 49 % होतात, याचा अर्थ 51% जनतेला त्यांच्यापेक्षा वेगळा मुख्यमंत्री हवा आहे आणि दोघांच्या मतांच्या टक्केवारीची वेगवेगळी आकडेवारी पकडली तर सुमारे 77 % लोकांना वेगळ्या मुख्यमंत्री हवा आहे, असा दावा अजितदादांनी केला आहे.
वास्तविक सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 % मते मिळाली आहेत काँग्रेसला 15% आणि ठाकरे गटाला फक्त 9 % मते मिळाले आहेत या विषयावर मात्र अजितदादा अजिबात बोलायला तयार नाही. फक्त शिंदे आणि फडणवीस यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवर सोयीस्कर रित्या त्यांना कौल नसल्याचा निष्कर्ष अजितदादांनी काढला आहे. पण प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसने फार मोठे फेरबदल करून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या जनतेने फक्त 11 % मतांचा कौल दिला आहे याकडे अजित पवारांनी दुर्लक्ष केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App