आमच्या बारामतीकरांचा माज गेला; दादांच्या आठवणी सांगताना कार्यकर्त्याचे शब्द!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : आम्ही बारामतीकर आहोत, असा आम्हाला माज असतो पण दादा गेले आणि आमच्या बारामतीकरांचा माज गेला!!, अशा शब्दांमध्ये बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या. या संदर्भातली बातमी सकाळने दिली. Ajit Pawr

अजित पवार कार्यकर्त्यांची कामे करायचे. जे काम होईल ते होईल जे होणार नाही ते होणार नाही असे सांगायचे. आम्ही त्यांना भेटायला जायचो. बारामतीत भेटले नाही तर पुण्यातल्या जिजाऊ बंगल्यावर जायचो. एकदा असेच भेटीला गेलो असताना त्यांनी मला विचारले तू का आलास??, तुझे पत्र मिळाले आहे. तुझे काम होईल.

आता तू जा. एवढे सांगून अजितदादांनी तिथल्या लोकांना विचारले, तुम्ही इथे कार्यकर्त्यांना चहापाणी दिलेत का का नाही दिलेत??, तुमच्या बापाचे काय जाते त्यांना चहापाणी द्या!!, कार्यकर्त्यांची एवढी विचारपूस करणारा नेता म्हणून आम्हाला अजितदादा हवे होते. आज अजितदादा गेले. आमच्या बारामतीकरांचा माज गेला!!, अशा शब्दांमध्ये या कार्यकर्त्याने भावना व्यक्त केल्या.

– “कोअर पॉवर” पोरगी

अजित पवार गेल्याने नेमकी कोणती पोकळी निर्माण झाली हे समजायला वेळ लागेल. पश्चिम महाराष्ट्रातला साखर पट्टा, सहकार, कृषी, शिक्षण या क्षेत्रांमधली “कोअर पॉवर” राजकारणाचा केंद्रबिंदू आणि त्यावर उभी असलेली “इको सिस्टीम” आज पोरकी झाली. येत्या काळात त्याचे पडसाद उमटतील, अशा भावना दुसऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

Ajit Pawr Baramati remembering karykarta

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात