अजित पवारांचा शरद पवारांना आणखी एक धक्का, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही दावा!


अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला ४० आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  अजित पवारांनी शरद पवारांना आणखी एक धक्का दिला आहे. कारण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपण स्वत: असल्याचे अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यानुसार अजित पवारांना राष्ट्रीय नेते करण्याचा प्रस्ताव अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडला, त्याला मेळाव्याला उपस्थितांनी अनुमोदन दिलं आहे.  निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटल आहे. Ajit Pawars another blow to Sharad Pawar now claiming the post of National President of NCP

एवढच नाही तर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर दावा करत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.  अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला ४० आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिलं आहे. या पत्रात ३० जून रोजी अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्यांचं नमूद करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आल्याचं समोर आलं आहे. कारण, २ जुलै रोजी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु त्याच्या दोन दिवस अगोदरच म्हणजे ३० जून रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता, तसेच विरोधी पक्षनेतेपदाचीही राजीनामा दिला होता.

तर दुसऱ्या बाजूला  शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आयोगाकडे आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अजित पवार गटाच्या अर्जावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचीही माहिती दिली आहे.

Ajit Pawars another blow to Sharad Pawar now claiming the post of National President of NCP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात