विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय शैलीतून इतर सर्व पक्षाच्या नेत्यांची आपल्या मागे कशी राजकीय फरफट केली, हे काँग्रेस आणि शिवसेनेच्या वर्तणुकीतून समोर आलेच, पण त्याचबरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या पक्षांच्या नेत्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॉपी करून आपली प्रतिमा निर्मिती करणे भाग पडले. याचे उदाहरण कर्जत जामखेड मधून समोर आले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी विकसित केलेल्या बूथ मॅनेजमेंटची कॉपी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेने करायचा प्रयत्न चालविला. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून त्याचा प्रत्यय आला. भाजपने जसे बूथ मॅनेजमेंट करून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला तसे आपणही करू शकतो, असा दावा या दोन्ही नेत्यांनी अनुक्रमे अहमदाबाद आणि नाशिक इथं केला.
दीपस्तंभ बाप..! कष्ट बापाचे, यश लेकाचे..! काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक श्री. बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका… pic.twitter.com/Q0SGyNFDqn — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2025
दीपस्तंभ बाप..!
कष्ट बापाचे, यश लेकाचे..!
काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक श्री. बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका… pic.twitter.com/Q0SGyNFDqn
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2025
पण त्या पलीकडे जाऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॉपी करणे भाग पडल्याचे दिसून आले. कर्जत जामखेडच्या दौऱ्यामध्ये त्यांनी एका टपरीवर चहा घेऊन त्या टपरी मालकाशी चर्चा केली. त्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करून पण कसे सहृदयी आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. मराठी माध्यमांनी देखील हिरवी कठोर आणि शिस्तप्रिय असलेल्या अजितदादांच्या स्वभावातला वेगळा पैलू समोर आला, अशी मखलाशी केली. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाय पे चर्चा या आयडियेची कॉपी अजितदादांनी हाणली.
कष्ट बापाचे, यश लेकाचे..! काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक श्री. बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका आपुलकीचा संवाद साधला तर कळलं की, त्यांनी अपार कष्टातून आपल्या मुलाला MBBS डॉक्टर बनवलं. स्वतः झिजून मुलाच्या जीवनाला, त्याच्या स्वप्नांना ढवळे यांनी आकार देण्याचं अमूल्य काम केलं. दिशादर्शकाची भूमिका बजावली. ढवळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.. त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला माझा सलाम..!
असे अजितदादांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App