विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाजप कोविङ प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात राबवत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय विसंगती दिसून आली आहे. Ajit Pawar wishes Modi on his birthday; National Unemployment Day from Congress
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांना सर्वांगीण प्रगती होवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत, तर युवक काँग्रेस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहे.
काँग्रेस समर्थकांनी ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, जुमला दिवस हे हॅशटॅग ट्रेङ केले आहेत. पंतप्रधान मोदींना दिलेल्या शुभेच्छा संदेशात अजित पवारांनी आपल्या नेतृत्वाखाली देशाची लोकशाही प्रबळ होऊन देश प्रगतीपथावर राहो आपले नेतृत्व जागतिक पातळीवर लखलखत आहे. आपली पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड देशातील जनतेचा आपल्यावरील विश्वास आणि अपेक्षा यांचे प्रतीक आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
त्याच वेळी देशभरात युवक काँग्रेसने राष्ट्रीय बेरोजगार दिवस, जुमला दिवस साजरा करायचे ठरवले आहे. बस्स झाले तुमचे “पकोडा इकॉनॉमिक्स” अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस बी. व्ही. श्रीनिवास यांनी ट्विट केले आहे. काँग्रेसच्या समर्थकांनी पदवीधारक पकोडा तळत असेल्याचे फोटो शेअर केले आहेत. मोदींनाच्या वाढदिवसाला काँग्रेसने देशपातळीवर त्यांची नकारात्मक प्रतिमा उभी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App