विशेष प्रतिनिधी
बीड : Ajit Pawar जो कोणी चुकीचं वागेल त्याला मकोका लावू आणि थेट जेलमध्ये घालू. त्यानंतर मग “चक्की पीसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग,” असे सांगत मला वाकड्यात जायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.Ajit Pawar
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. सांगूनही ऐकलं नाही तर मोक्का लावेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.Ajit Pawar
अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मुख्य इमारतींचे इलेव्हेशन प्लॅन, श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आराखडा, ग्रंथालय इमारत, सहकार संकुल आदी विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.
अजित पवार म्हणाले की, जर कोणी चुकीचे वागत असेल आणि कायदा हातात घेत असेल, तर त्यांना शासन झालं पाहिजे. कारण मधल्या काळामध्ये जिल्ह्याची बदनामी झाली आहे. मात्र यापुढे ते खपवून घेतलं जाणार नाही. माझ्यासकट कायदा सर्वांना समान आहे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जाती धर्माचा आहे, हे न पाहता त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि त्याच संविधानाप्रमाणे कार्यवाही होईल. त्यामुळे कोणीही चुकीचे वागू नका. तसेच चुकीचं वागणाऱ्यांना सांगा की, पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे. यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. कोण मोठा, कोण छोटा हे न पाहता कार्यवाही झाली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App