Ajit Pawar प्रचंड दबावानंतर “पवार संस्कारितांची” नैतिकता झाली जागी; तरीही धनंजय मुंडेंना वाचवायची तयारी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी फडणवीस सरकारची प्रतिमा हानी करूनच त्याला अखेर अर्धविराम मिळाला. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः मुंडे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहता प्रचंड दबावानंतर “पवार संस्कारितांची” नैतिकता झाली जागी, तरीही धनंजय मुंडेंना वाचवायची तयारी!!, असेच राजकीय चित्र मुंबईतून बाहेर आलेल्या बातम्यांमध्ये दिसले.

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, एवढे चारच शब्द अजित पवार यांनी उच्चारले, तर संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर माझी विवेक बुद्धी जागी झाली आणि वैद्यकीय कारणासाठी मी राजीनामा दिला असे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर लिहिले.

पण “पवार संस्कारितांची” नैतिकता समजण्यासाठी आणि त्यांची विवेक बुद्धी जागी होण्यासाठी फडणवीस सरकारची अब्रू वेशीवर टांगावी लागली. एवढे सगळे होऊनही धनंजय मुंडे यांना वाचविण्याची तयारी मंत्रालयात सुरू असल्याची बातमी बाहेर आली. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात सीआयडी कडे कुठलाही पुरावा नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे सीआयडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलेले नाही.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडेंचा राईट हॅन्ड वाल्मीक कराड हाच आहे. त्याच्या विरोधात आरोप पत्रामध्ये तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. शिवाय या प्रकरणातला एक आरोपी अजून फरार आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातली सगळी कायदेशीर प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्याची तयारी असल्याचे मुंबईच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Ajit Pawar trying to save dhananjay munde from legal battle

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात