विशेष प्रतिनिधी
सांगली : जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचे आणि आमचीच बिन पाण्याने करायची,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.
प्रा. एन. डी. पाटील यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा शनिवारी (16 ऑगस्ट) सांगली येथे पार पडला. या सोहळ्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवार तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील इत्यादी नेते एकाच मंचावर होते.
अजित पवार की, “आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही. मला रोहितने सांगितले की, जयंत पाटील आणि मी हेलिकॉप्टरने जाणार आहोत. त्यावेळी मला असे वाटले माझे भाषण ऐकायला दोघेही नाहीत. पण माझ नशीब बघा की, दोघे सुद्धा भाषण ऐकायला इथे उपस्थित आहेत. आता त्यांनी जयंत पाटील यांच्या आवाजात प्रेमळपणा असलेले देखणे व्यक्तीमत्व आहे, असा उल्लेख केला. जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का?
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील भाषणात म्हणाले की, “वाळवा तालुक्यातील एखादा विद्यार्थी खंडपीठाच्या न्यायाधीशपदी बसेल, असे आपले स्वप्न आहे. वाळवा तालुक्यातील विधी महाविद्यालयास आपण एन. डी. पाटील यांचे नाव देतो आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी फार मोठी आहे. एन. डी. पाटील यांचे जे व्यक्तिमत्व होते, ते वाळवा तालुक्याचा स्वभाव सांगणारे होते.”
मी दोन्ही दादांना म्हणजे अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांना सांगू इच्छितो की, हा वाळवा तालुका फार स्वाभिमानी तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथ नायकवडी, बाबूजी पाटणकर, बरडे गुरुजी, पांडू मास्तर या आणि इतर अनेक स्वातंत्र्यसैनिक वाळवा तालुक्यातील होते. या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांशी संघर्ष करताना कधी माघार घेतली नाही. या तालुक्याचे हे सर्वांत मोठे वैशिष्टय आहे. कदाचित संपूर्ण भारतातील सर्व तालुक्यांपेक्षा वाळवा तालुका वेगळा आहे, असे मी मानतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App