विशेष प्रतिनिधी
मुंबई : वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात वैष्णवी चा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच पोलिसांवर दबाव असल्याचे उघड झाले. राजेंद्र हगवणे आणि त्याच्या परिवाराला पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप वैष्णवी चे वडील कस्पटे यांनी केला.
पार्श्वभूमीवर खुद्द अजित पवारांनी काल बारामतीत आणि आज कोल्हापुरात या संदर्भात कठोर भूमिका घेतली. राजेंद्र हगवणे आणि अजित पवार यांच्यातले निकटचे संबंध माध्यमांनी उघडकीस आणले. त्याचे वेगवेगळे पैलू जनतेसमोर मांडले. राजेंद्र हगवणे सारख्या नराधमाला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी केले होते त्याच्याकडे मुळशी तालुका अध्यक्ष पद होते. त्यामुळे माध्यमांनी अजित पवारांना टार्गेट केले पण अजित पवारांनी त्याबद्दल माध्यमांना झापले.
कुणी माझ्याबरोबर फोटो काढला, तर त्यात माझा काय दोष??, माध्यमांना अजित पवार शिवाय दुसरे काही उद्योग नाहीत म्हणून ते वाट्टेल तशा बातम्या देतात, असा आरोप अजित पवार यांनी माध्यमांवर केला.
पण याच अजित पवारांचे राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पुरते वाभाडे काढले. राजेंद्र हगवणे सारखा नालायक नेता माझ्या पक्षात नको म्हणून मी त्याची हकालपट्टी करतो, असे अजित पवारांनी काल बारामती जाहीर केले होते, पण त्यांनी जळगावात स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलेले नेते तपासावेत. त्यांची पण अशीच प्रकरणे बाहेर येतील, असा टोला गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता हाणला.
अजित पवारांनी नुकताच जळगावात एक मोठा कार्यक्रम घेऊन गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेतले होते. गुलाबराव देवकर आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु, त्यांना सत्तेच्या वळचणीला यायचे वेध लागल्याने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले. गुलाबराव पाटलांच्या टीकेचा रोख गुलाबराव देवकरांवरच असल्याचे दिसून आले. गुलाबराव देवकर यांचे नाव त्यांनी घेतले नाही पण त्यांचे बरेच “उद्योग” आणि प्रकरणे लवकरच बाहेर येतील असा सूचक इशारा देऊन गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना घेरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App