जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री पदाचे कोथरूडमध्ये बॅनर; पण कर्नाटकाच्या लिस्ट मधून वगळले स्टार कॅम्पेनर!!

प्रतिनिधी

पुणे : जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्रीपदाचे कोथरूडमध्ये बॅनर; कर्नाटकाच्या लिस्ट मधून वगळले स्टार कॅम्पेनर!!, असे अजित पवारांच्या बाबतीत घडले आहे. Ajit Pawar supporters irrect banners of his chief ministership but NCP dropped him from star campaigners list in karnataka

अजित पवारांनी काल सकाळला दिलेल्या मुलाखतीत स्वतःचे मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा जाहीर केली. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटले. अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर राष्ट्रवादीतल्या अजितदादा समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अजितदादा समर्थकांनी “जनतेच्या मनातले मुख्यमंत्री” असे अजितदादांचे बॅनर लावले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड मतदार संघात अजितदादांचे असे बॅनर लागलेले दिसले.

पण त्याच वेळी हेच “जनतेच्या मनातले मुख्यमंत्री” राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक मधल्या विधानसभा निवडणुकीत स्टार कॅम्पेनरच्या यादीतून मात्र वगळलेले दिसले!!

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर तो परत मिळवण्याच्या दृष्टीने मोठ्या हालचाली करून राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवत आहे. राज्यात 224 जागांपैकी 46 जागा लढवण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा आहे. त्यापैकी 9 उमेदवारांची यादी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. त्याचबरोबर पक्षाने स्टार कॅम्पेनरची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीत अजितदादांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे खासदार मोहम्मद फैजल यांची नावे प्रामुख्याने स्टार कॅम्पेनरच्या यादीत झळकली आहेत. त्यानंतर कर्नाटकातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे त्या यादीत आहेत, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार मात्र या स्टार कॅम्पेनरच्या यादीत नाहीत. म्हणजेच ज्या दिवशी अजितदादांचे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असे बॅनर लागले, त्याच दिवशी त्यांचे नाव स्टार कॅम्पेनरच्या यादीतून वगळले हा विलक्षण वेगळा राजकीय योगायोग राष्ट्रवादीने साधला आहे!!

Ajit Pawar supporters irrect banners of his chief ministership but NCP dropped him from star campaigners list in karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात