थांबलेली भाकरी पुढच्या भाकऱ्या फिरवणार; राष्ट्रवादीच्या पवारकृत सर्जरीत अजितदादा समर्थक धोक्यात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “फिरलेली भाकरी थांबली”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेताना पत्रकार परिषदेत केले. मात्र त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी बाकीच्या भाकऱ्या फिरवण्याची घोषणा केली. यातून त्यांनी अजित पवार समर्थकांना एक गंभीर इशारा दिला आहे आणि तो पक्ष संघटनेअंतर्गत सर्जरीचा आहे. Ajit Pawar supporters in danger zone in NCP major reshuffle by sharad Pawar

शरद पवारांनी जे जाहीर केले आहे, ते अजित पवारांच्या समर्थकांसाठी संघटनात्मक पातळीवर घातक ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण पवार आता जिल्हा पातळीपासून ते प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत स्वतः लक्ष घालून संघटनेत बदल करणार आहेत. नव्या कार्यकर्त्यांना बढती देऊन पदाधिकारी बनवणार आहेत. जिल्हा पातळीवर 10 – 15 वर्षे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवर काम करणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर कामाची संधी पवार देणार आहेत. याचा नेमका राजकीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे.

अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपले कट्टर समर्थक तयार केले, ते वेगवेगळी पदाधिकारी पदे देऊनच. जिल्हा – तालुका – विभाग पातळीपर्यंत अजितदादांचे संघटनात्मक पातळीवर वर्चस्व आहे. ते निर्माण करण्यासाठी अजितदादा वर्षानुवर्षे खपले. स्थानिक पातळीवर त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष सरचिटणीस, सचिव असे पदाधिकारी आहेत. तशीच अवस्था प्रदेश पातळीवर आहे. प्रदेश पातळीवरचे बहुतेक पदाधिकारी अजितदादांचे समर्थक आहेत.



पण आता जेव्हा शरद पवार स्वतः लक्ष घालून जिल्हा पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या करणार आहेत, तेव्हा नेमकेपणाने वेचून अजितदादा समर्थकांना बाजूला करून तेथे सुप्रिया सुळे समर्थकांची वर्णी लावण्याची दाट शक्यता आहे.

अजितदादांबरोबर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजप बरोबर जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होतीच, त्या सर्वांची तिकिटे 2024 च्या निवडणुकीत निश्चित धोक्यात आली आहेत. पण त्या पलीकडे त्या आमदारांचे विश्वासू पदाधिकारी देखील आता संघटनात्मक पातळीवर धोक्यात आले आहेत. त्यांनी आपल्या निष्ठा अजितदादांपासून बाजूला काढून सुप्रिया सुळे यांच्या प्रति व्यक्त कराव्यात, अन्यथा त्यांना बाजूला करण्यात येईल, असा सुप्त संदेशच पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.

संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादीत जेव्हा तळापासून बदल होतील, ते सगळे बदल सुप्रिया सुळे यांच्या भावी अध्यक्षपदासाठी संपूर्णपणे अनुकूल असतील, याची दखल स्वतः शरद पवार घेतील. जेणेकरून 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे अजितदादा समर्थक नव्हेत, तर सुप्रिया समर्थक राहतील याची राजकीय तजवीज पवार येते 6 महिने ते वर्षभरात करतील. हा सुप्त इशारा मान्य करून जे राष्ट्रवादीचे काम करत राहतील त्यांच्यासाठी पक्षात संधी जरूर राहील, पण अजितदादांच्या निष्ठावंतांना आता संधी मिळणार नाही, हाच संदेश पवारांनी दिला आहे.

Ajit Pawar supporters in danger zone in NCP major reshuffle by sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात