विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.Ajit Pawar
सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आम्ही देखील करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीही गैर नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.Ajit Pawar
अजित पवार यांचे पक्षावर आता नियंत्रण राहिलेले नाही. त्यांचा पक्ष प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी हायजॅक केला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या या आरोपाला सुनील तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. मात्र आता थेट अजित पवार यांनी याप्रकरणी नाक खुपसण्याची गरज नसल्याचे म्हणत रोहित पवार यांना चांगलेच सुनावले आहे.
अजित पवारांच्याच हातात पक्ष राहिला नाही – रोहित पवार
रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवाराचा पक्ष कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. अजित पवारांच्या पक्षात सर्वजण एका विचाराचे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता अजित पवारांच्याच हातात पक्ष राहिला नाही. दादांनी एका कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर निलंबनाची कारवाई केली होती. पण त्यानंतर एका नेत्याने त्याला बढती दिली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले होते.
सुनील तटकरे यांचेही प्रत्युत्तर
सुनील तटकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. रोहित पवार यांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेत नाही. त्यांनी आपले घर (पक्ष) पेटलेले आहे की, शांत आहे हे त्यांनी पहावे. त्यांनी त्याची अवस्था पहावी. त्यातील अंतर्गत कुरघोड्या पहाव्या. त्यानंतर इतर राजकीय पक्षांवर टीका करण्याचा अधिकार आहे. अजून तुम्ही खूप बालिश आहे, असे ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App