अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मिमिक्री’द्वारे केलेली टीका धुडकवून लावली आहे. कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाही. मी काम करणारा माणूस आहे. काम करतच राहणार, असे ते म्हणाले. Ajit Pawar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदार यादीतील गैरसोयीची नावे काही तासांतच गायब केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या भेटीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करून त्यांच्यावर निशाणा साधला होता. पत्रकारांनी याविषयी अजित पवारांना छेडले असता त्यांनी आपल्याला अशा प्रकारच्या मिमिक्रीमु्ळे काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत – अजित पवार

अजित पवार म्हणाले, कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. पण मी काम करणारा माणूस आहे. मी काम करत राहीन. सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करते? मग मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यानंतर तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्न विचारणार की, अजित पवार तुम्हाला असे म्हणत होते. मला या सगळ्यात पडायचे नाही.



आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे?

निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत दिसून आले. पत्रकारांनी याविषयी त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मी 2017 मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार? हे महत्त्वाचे आहे. कुणासोबत होणार हे महत्त्वाचे नाही. 2017 च्या पत्रकार परिषदेतही मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेससुद्धा होती. तसेच अजित पवारही होते. खरेतर त्यांनी आज आमच्यासोबत यायला हवे होते. कारण, त्यावेळी ते खूप तावातावाने बोलत होते. ते सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगत होते, असे राज ठाकरे अजित पवारांची नक्कल करताना म्हणाले.

विरोधकांची मतदारयाद्या दुरुस्त करण्याची मागणी

विरोधकांनी काल राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे व मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदारयाद्या दुरुस्त करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार यादीमधील अनंत चुका पुराव्यानिशी दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील या प्रकरणी म्हणाले, मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहत नाही. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिकमध्ये एकच घरात 813 मतदारांची नोंद आढळली.

नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव 6 वेळा वेगवेगळ्या EPIC ID सह असल्याचे 12 ऑगस्ट रोजी विविध न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुराव्यासह प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर ते नाव हटवले गेले. हे नाव कोणी हटवले? हे नाव हटवण्याची तक्रार कोणी केला? आत्ता आमचा असा समज झाला आहे की, राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरा कुणीतरी चालवतो. निवडणुकीत मतदान झाल्यावर किती पुरुषांनी आणि महिलांनी मतदान केलं या याद्या दर तासाला जाहीर होतात. पण विधानसभेला ही सिस्टीम मोडण्यात आली. कोणी किती मतदान केलं हे दोन दिवसानंतर जाहीर करण्यात आले. हे पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले होते.

Deputy CM Ajit Pawar Dismisses Raj Thackeray’s Mimicry: ‘Mimicry Makers Will Continue, But I Am Committed to Work’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात