Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, मला नाराजी बद्दल काही माहित नाही, मला असे काही जाणवले देखील नाही. मला असे वाटले की कारण आमचे पण बरेच मंत्री नव्हते आणि मला असा समाज झाला की आज छाननी आहे, नगरपालिका आणि नगरपंचायतीची त्यामुळे हे लवकर गेले असा माझा समज होता. मला असे काही जाणवले असते की नाराजी असेल तर मी लगेच एकनाथ शिंदे यांना विचारले असते, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.Ajit Pawar



प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो

तसेच प्रत्येक जण आपापले पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रमाण निवडणुकीच्या काळात वाढलेले असते. तिकिटे देण्याच्या निमित्ताने वाढते आणि त्याच्यातून आज उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सहकारी मी तिथे नव्हतो पण एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती, असे माझ्या कानावर आले होते.

बिबट्याच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

अजित पवार म्हणाले, आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेले आहेत आणि खूप भीतीचे वातावरण राज्यातील अनेक भागात, नाशिक असेल, अहिल्यानगर जिल्हा, कोकणातील रत्नागिरी या भागांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. याचा बंदोबस्त कसा करायचा या विषयवार मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानुसार अशा भागांमध्ये शाळेचा वेळ हा 9.30 ते 4.00 असा केला आहे. ज्यामुळे साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत, असा निर्णय घेतला गेला आहे.

बिबट्यांसाठी दोन केंद्र सुरू करण्यात येणार

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरे म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामांना, जसे आम्ही पुणे जिल्ह्याला साडे अकरा कोटी दिले, तसे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तिथले एसपी, सीपी यांनी देखील गस्त वाढवावी, अशा पद्धतीच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे आहेत तसेच जुन्नरच्या परिसरात माणिकडोहला बिबट्यांचे एक केंद्र सुरू केले आहेत, तशी दोन सेंटर सुरू करायची आणि हे बिबटे पकडून तिकडे न्यायचा निर्णय झाला आहे.

नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घेतली जाईल

फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांना गोळी घालण्याचे परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे त्यानुसार बंदोबस्त करण्यात आलेला आहे. परंतु, खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. तसेच आता आपण सोलर वीज देत आहोत, पण अजूनही जिथे इलेक्ट्रिक मोटारी आहेत, अशा शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. जे 2 सेंटर सुरू करायची आहेत त्याचा प्लॅन एस्टिमेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिबटे पकडून तिथे ठेवायचे आहेत आणि याचा खर्च देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करणार आहे. तसेच तिथल्या लोकांची सुरक्षा महत्त्वाची असणार आहे, त्यानुसार उपाययोजना केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

सगळेच बिबटे जंगलात वाढलेले नाहीत, वर्षाला साधारण 8 पिल्लांची पैदास एक मादी देत असते. तसेच यांची पैदास जंगलात नाही झाली त्यामुळे कुत्रे, गाई, म्हशी यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

Ajit Pawar Shinde Group Discontent Reaction Cabinet Boycott Photos Videos Statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात