अजितदादांना तिहार जेलमध्ये जायचे नव्हते म्हणून ते…; आता पवारांकडेही काही उरले नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखे नेतृत्व सगळ्या जगात नाही त्यामुळे त्यांच्या विकास यात्रेत सहभागी झालो, असे सांगत अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अजितदादांच्या भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.Ajit pawar scared of tihar jail, prakash ambedkar also targets senior pawar

अजित पवार यांना तिहार जेलमध्ये जायचे नव्हते म्हणून तर त्यांना भाजपसोबत जाणे भाग पडले. जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे अजितदादा खंडन करू शकले नाहीत, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फोडण्यात अमित शाह यांना यश का आले??, हे यातून कळते, अशी खोचक टिपण्णीही प्रकाश आंबेडकरांनी केली.



प्रकाश आंबेडकर म्हणाले :

शरद पवार हे सिनियर आहेत. वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहिले आहे??

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली तरी भिडेंवर कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत.

महात्मा गांधींचा अपमान झाल्याचे ज्यांना वाटते त्यांनी त्यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार यांच्या घराबाहेर जाऊन धरणे आंदोलन करावे. पण तेच सरकारमध्ये बसलेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करावे.

आपल्या देशाचे नाव भारत असले तरी त्याला “युनियन” म्हणतात. त्यामुळे त्यातला “युनियन” शब्द महत्वाचा आहे. माळी धनगर एकत्र बसतात का? शिया -सुन्नी एकत्र बसतात का? त्यामुळे आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे.

 ‘INDIA’ आघाडी तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये जिंकू शकेल का? सत्तेवर बसलेला माणूस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी मोदींच्या जागी असतो तर तेच केले असते. ज्याच्याकडे कुलूप असते, त्याची चावी त्याच्याकडेच असते.

पण आता पंतप्रधानांचा चेहरा दाखवा हा खेळ चालू आहे. ही पद्धत चुकीची आहे. जो कोणी पंतप्रधान होणार आहे त्याला अधिक खासदारांचा पाठींबा असणे गरजेचे आहे. मात्र लोकांना पंतप्रधान निवडण्याचा प्रकार चुकीचा आहे. ही पद्धत अराजकतेकडे जाणारी पद्धत आहे.

Ajit pawar scared of tihar jail, prakash ambedkar also targets senior pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात