Ajit Pawar : चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले- समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही, कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Ajit Pawar नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, आपल्या पक्षाला सध्या अडचणीच्या काळातून जावे लागत आहे. हेही दिवस निघून जातील. आपल्याला कोणाचे घास काढून घ्यायचे नाही आणि कोणावर अन्यायही होऊ द्यायचा नाही. जाती जातीत वाद होतील असे कुठलेही कृत्य करायचे नाही, अशा सूचना देखील पवारांनी यावेळी बोलताना दिल्या.Ajit Pawar

आपल्याला पक्ष वाढवायचाय

अजित पवार म्हणाले, मोठी महत्वाकांक्षा ठेवायला हवी. आपल्याला पक्ष वाढवायच आहे. परिस्थितीला जुळवून घेता आले पाहिजे. तसेच उत्तरदायित्व विसरता कामा नये. यासोबत संयम, वेळेच्या बाबत कार्यतत्पर राहायला पाहिजे, पॉझिटिव्हटी ठेवायला पाहिजे. वेळा पाळायला शिका. पुढच्या वेळी जर कोण उशिरा आले तर दार बंद केले जाईल.Ajit Pawar



कोणाला अंगावर घेऊ नका

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही अमित शहा यांना भेटलो त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले होते की जातीय द्वेष महाराष्ट्रात चालत नाही. संत तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे पक्षपात न करता काम करत राहायला हवे. हाच आपला मार्ग आहे. देशपातळीवर एखादा प्रसंग घडला तर त्यावेळी नवाब मलिक व्यवस्थित भूमिका मांडत होते. सध्या काही प्रवक्ते असे काही बोलून जातात की आगीतून उठून फुपाट्यात पडल्यागत होते. असे होऊ देऊ नका. कोणाला अंगावर घेऊ नका. पक्ष नीट सांभाळा. पक्षाची प्रतिमा चांगली कशी राहील हे पहा.

दिलेली आश्वासने पूर्ण करणे आपले काम

सहकार मधून रोजगार कसा निर्माण करता येईल यावर काम केले जाईल. महिलांसाठी होस्टेल करण्याबाबत देखील निर्णय घेतला जाईल. निवडणुका पार पडल्यानंतर आपण जी आश्वासन देतो ती पूर्ण करणे आपले काम आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण काम करत आहोत. रोजगार वाढविण्यासाठी इनोव्हेशन सेंटर इंक्युबेशन सेंटर आपण आणत आहोत. सी ट्रिपल आयटी शिक्षण याठिकाणी घेतले जाईल वर्षाला 7 हजार विद्यार्थी यातून बाहेर पडतील. टाटा ट्रस्ट यासाठी मदत करत आहे. 200 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट आहे टाटा ट्रस्ट 165 कोटी रुपये देणार आहे आणि राज्य सरकार 35 कोटी रुपये देणार आहे. तरुणाच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी एक थिंक टैंक तयार करत आहोत. महाराष्ट्र 2050 साठी हे काम करेल असे अजित पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार यांची सूचना मला पाळावीच लागेल

पक्ष प्रवेश देताना चांगल्या माणसाला प्रवेश द्या अन्यथा आपल्याला ट्रोल केले जाते. प्रत्येकाच्या परिश्रमाचा सन्मान करणे आपले काम करावे लागेल. सुनेत्रा पवार म्हणाल्या कुणाला संधी द्यायची हे आपल्याला पहावे लागेल. सुनेत्रा पवार यांची सूचना आहे मला पाळावी लागेल. हे आधीच सांगितले असते तर आपला पक्ष कुठल्या कुठे गेला असता असे अजित पवार म्हणाले. आता आम्ही दोघे पण भाषण करत असतो. आधी माझा रात्रभर काय बोलायचे याचा गृहपाठ व्हायचा. आता देखील मी जे बोलतोय त्यावर टिक केले जात आहे.

Ajit Pawar Says Social Discord Not Affordable

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात