विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या काळात अडवून धरलेले बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण झाल्याने काम वेगाने होऊन अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन लवकरच धावणार, बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन विकास संस्था आर्टी स्थापन करून आदिवासी विकास साधणार, तसेच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही असे म्हणत 40 तालुक्यांमध्ये तातडीच्या दुष्काळ निवारण उपाय योजना करणार घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केल्या. Ajit Pawar presented the interim budget of Maharashtra
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी 4 महिन्यांचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करणार, नगरविकास विभागासाठी 10 हजार कोटी, बांधकाम विभागासाठी 19 हजार 900 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटी दिले जाणार आहेत. ईस्टर्न फ्रीचा विस्तार ठाण्यापर्यंत केला जाणार आहे तर 18 लघुवस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App