विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आणि “मन की बात” जाहीर केल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या. अर्थातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्याचे मोठे पडसाद उमटले. अजितदादांच्या समर्थकांनी त्यांची “मन की बात” उचलून धरली, तर विरोधकांनी संख्याबळाची बात सांगून अजितदादांना वास्तवाची जाणीव करून दिली.Ajit Pawar opened up his mind for chief ministership, but will it be fulfilled??
संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने नेहमीच मोठ्या राजकीय आव्हानाचाच विषय राहिला आहे. शरद पवारांच्या राजकीय प्रतिमेपेक्षा त्यांचे संख्याबळ नेहमीच व्यस्त म्हणजे खूप कमी राहिले आहे. पवारांची राजकीय प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या समर्थकांनी देशव्यापी नेतृत्वाची केली आहे आणि विरोधकांनी देखील पवारांच्या वयाचा सन्मान ठेवून ती प्रतिमा काही अंशी मान्यही केली आहे. पण तशी प्रतिमा असणे निराळे आणि प्रत्यक्ष तशी ताकद उभी करणे निराळे हे शरद पवारांच्या गेल्या 50 55 वर्षांच्या राजकीय कर्तृत्वाचे फलित आहे आणि इथेच अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजकीय महत्त्वाकांक्षाची “मन की बात” की मनाच्या बाता याचे रहस्य दडले आहे!!
कोणत्याही नेत्याने राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवणे हा राजकारणातला एक अपरिहार्य भाग आहे किंबहुना महत्त्वाकांक्षा ही संकल्पनाच राजकारणातला सर्वात मोठा घटक आहे. त्या महत्त्वाकांक्षेशिवाय कोणतेही राजकारणच घडू शकत नाही. पण लोकशाही संकेतांमध्ये महत्त्वाकांक्षा जाहीर करणे आणि त्या फलद्रूप होणे यात खूप मोठे अंतर असल्याचा राजकीय अनुभव आहे. आत्तापर्यंत वैयक्तिक पातळीवर एखाद्या नेत्याने महत्त्वाकांक्षा जाहीर केली आणि ती स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केली हे फारच क्वचित घडले आहे. ज्यांनी स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन केले, त्यांनी उघडपणे कधीच आपण मुख्यमंत्री होणार आपण पंतप्रधान होणार अशी वैयक्तिक पातळीवर महत्वकांक्षा जाहीररित्या बोलून दाखवली नाही आणि ज्यांनी बोलून दाखवली त्यांनी ती पूर्ण केल्याचे उदाहरण विरळाच आहे!!
प्रादेशिक पक्ष स्थापन करणारे नेते मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वाकांक्षा बोलून दाखवण्यापेक्षा ती कृतीतून दाखवतात आणि त्यांना अनुयायी फॉलो करतात. हे एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, एन. टी. रामाराव बिजू पटनाईक ममता बॅनर्जी यांच्यापासून अनेक नेत्यांनी सिद्ध केले आहे.
पण महाराष्ट्रात असे उदाहरण अपवादासाठी देखील सापडत नाही महाराष्ट्राचा राजकीय इतिहास तपासला असता एखाद्या व्यक्तीने एखाद्या राजकीय नेत्याने मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा जाहीर रित्या बोलून दाखवली आणि ती पूर्ण झाली असे उदाहरण नाही काँग्रेसचे वर्चस्व असताना पंडित नेहरून पुढे इंदिरा गांधींपुढे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जाहीर करण्याची कोणा नेत्याची हिम्मत नव्हती आणि त्यानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर तसे उघड बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती.
त्यापलीकडे जाऊन शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचा आढावा घेतला, तर खुद्द अजितदादांनीच 2004 चा त्यांचा निर्णय चुकल्याचे परखडपणे बोलून दाखविले आहे. 72 आमदार निवडून आल्यानंतरही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद 69 आमदार असलेल्या असलेल्या काँग्रेसला दिले याचा अर्थच पवार काँग्रेसच्या हायकमांड कडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळवू शकले नव्हते असेच अजितदादांनी स्पष्ट सूचित केले आहे.
याचा अर्थच मुख्यमंत्री पदाची “मन की बात” करणे वेगळे आणि मनाच्या बाता मारणे वेगळे!! “मन की बात” तेव्हाच करता येते, जेव्हा पूर्ण बहुमत मिळवून एखादी एखादा नेता मोठ्या पदावर आरुढ होतो, अन्यथा तसे मोठ्या पदावर आरूढ होणे हे नुसत्याच मनाच्या बाता मारल्यासारखे होते!!
तशीही एक बाब इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” हा कार्यक्रम पंतप्रधानपदी आरुढ होण्यापूर्वी नव्हे, पंतप्रधान पदावर आरूढ झाल्यानंतर सुरू केला आहे…!! त्यांनी मनाच्या बाता मारलेल्या नाहीत, इतकेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App