नाशिक : महाराष्ट्रातल्या महायुती सरकार मध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या “डबल गेमा” सुरू आहेत. एकीकडे सरकार नाशिक मधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनात काटेकोरपणा आणत असताना दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या मार्गांनी कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे आणत आहेत.
नाशिक मधल्या तपोवनच्या परिसरात साधूग्राम उभारताना वृक्षतोड हा मुद्दा नाशिक मधल्या कम्युनिस्टांनी आणि लिबरल लोकांनी तापविला. त्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोरदार हवा दिली. तपोवन आतल्या एकाही झाडाला अजून हात लावला नसताना सरकार अख्खे तपोवन तोडायला निघाले आहे, असा आव आणत सयाजी शिंदे यांनी फडणवीस सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांना घेरले.
तपोवनातले एकही मोठे झाड तोडणार नाही. जे छोटे वृक्ष अनावधानाने लावले गेलेत, ते बाजूला करू. शिवाय नाशिकच्या परिसरात जास्तीची 15000 झाडे लावू, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते समाधानी झाले नाहीत. त्यांनी तपोवनचा मुद्दा सोडला नाही.
– शेतकरी कृती समितीच्या नावाखाली आंदोलन
तपोवनाच्या मुद्यापाठोपाठ आता शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुंभमेळ्यासाठी 350 एकर पेक्षा एकही इंच भूमी साधूग्राम साठी देणार नसल्याची हाकाटी पिटली आहे. छगन भुजबळांच्या समता परिषदेचे कार्यकर्ते समाधान जेजुरकर यांनी शेतकरी कृती समिती स्थापन करून शेतकऱ्यांची एक बैठक घेतली आणि तिच्यातून कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायला विरोध केला.
या आधीचा म्हणजे 2013 चा सिंहस्थ कुंभमेळा झाला त्यावेळी साडेतीनशे एकर जमिनीवर आरक्षण टाकले होते. 2026 – 27 चा कुंभमेळा सुद्धा तेवढ्यात जागेवर करावा. 1200 एकर जमिनीवर आरक्षण टाकू नये, अशी मागणी समाधान जेजुरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीने केली. वास्तविक 2013 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये झालेली गर्दी आणि 2026 – 27 मध्ये होणारी गर्दी यात जमीन आसमानाचे अंतर आहे. सरकार त्या दृष्टीने नियोजन करत आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा शेतकरी कृती समितीने लक्षात घेतला नाही. शिवाय सर्व जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा सरकारचा विचार आहे.
पार्थ पवारचा जमीन घोटाळा
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या निमित्ताने आधीच अजितदादा स्वतः आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय खिंडीत सापडले आहेत. त्यातून सुटण्याचा मार्ग त्यांना नीट दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी सरकारमध्ये राहूनच डबल गेमा सुरू केल्यात का??, असा सवाल समोर आला आहे. त्याचबरोबर बळकट भाजप बरोबर त्यांचा पंगा असल्यामुळे यात अजितदादांना कितपत यश येईल??, याविषयी सुद्धा दाट शंका आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App