विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचल्या बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार “ऍक्टिव्ह” झाले. त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रालयातल्या आपल्या केबिनमध्ये चर्चेसाठी बोलावले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा वेगाने सुरू झाली.
संतोष देशमुख प्रकरण ऐन भरात असताना अजित पवार नामानिराळे राहत होते. ते फक्त एकदा मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटले. त्यानंतर ते परदेशात निघून गेले. संतोष देशमुख प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय दृष्ट्या आणि कायदेशीर पातळीवर हाताळले. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.
फडणवीसांनी कायद्याच्या कसोटीवर सर्व प्रकारच्या कार्यवाही करून संतोष देशमुख प्रकरणांमध्ये एसआयटी नेमली. चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. याच काळात मुख्य आरोपींच्या मुस्क्या बांधल्या. त्याचवेळी राजकीय पातळीवर सुरुवातीला धनंजय मुंडे आणि त्यानंतर थेट अजित पवारांकडे संशयाचे बोट दाखवले गेले. धनंजय मुंडे यांनी टप्प्याटप्प्याने आपली भूमिका मांडून बचाव केला, पण अजित पवार या सगळ्या प्रकरणात नामानिराळे राहत होते.
Eknath Shinde एकनाथ शिंदेंना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियावर व्हिडिओनंतर गुन्हा दाखल; पोलिसांकडून शोध सुरू
बीड जिल्ह्यातले सगळे गुंडगिरीचे राजकारण पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने पोसले. त्याचे भरण पोषण केले. त्याचे रूपांतर हिंसक राजकीय चिखलात झाले. त्यातूनच धनंजय मुंडे + वाल्मीक कराड अशा प्रवृत्ती निर्माण झाल्या. बीडमध्ये राख माफिया तयार झाले. हे सगळे काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि अखंड राष्ट्रवादीची राजवट असताना घडले. त्यावेळी शरद पवार किंवा अजित पवारांनी बीड मधल्या गुंडगिरीच्या मुस्क्या आवळल्या नाहीत.
पण आता पाणी डोक्यावरून गेल्यानंतर मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बीड मधल्या गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी केली. यातून त्यांनी धनंजय मुंडेंना सोडणार नसल्याची “हिंट” दिली. त्याबरोबर अजित पवार ऍक्टिव्ह झाले त्यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या केबिनमध्ये चर्चेसाठी पाचारण केले
दरम्यानच्या काळात संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून आले. त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील होते. त्यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर नंतर माफी मागितली आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि कारवाईवर विश्वास दर्शविला. या सगळ्यातून धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद अडचणीत आल्याचा अर्थ मराठी माध्यमांनी काढला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App