नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर कुणी कुठे बाजी मारली, याची वर्णने करताना मराठी माध्यमांनी पुणे जिल्ह्यात अजितदादांचा जलवा 17 पैकी 10 नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा!!, असे वर्णन केले. पण हे वर्णन करताना मराठी माध्यमांनी राजकीय सत्य मात्र दडपून टाकले. Ajit Pawar
प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या 17 नगरपालिकांपैकी 10 नगरपालिकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष झाले असले, तरी 7 नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगराध्यक्ष झाले, याचा अर्थ अजित पवारांचा जलवा निम्म्या पुणे जिल्ह्यातच चालला, ही वस्तुस्थिती समोर आली, पण ती मराठी माध्यमांनी सांगितली नाही. त्यांनी फक्त अजित पवारांचा जलवा पुणे जिल्ह्यात चालल्याचे वर्णन केले.
– राष्ट्रवादीची घसरण
प्रत्यक्षात एकेकाळी अखंड राष्ट्रवादीचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात जलवा होता. कारण पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे जिल्ह्यातल्या पंचायत समित्या आणि नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. पण राष्ट्रवादीच्या कर्तृत्वाला लवकरच उतरती कळा लागली आणि आज त्याचे प्रत्यक्ष स्वरूप असे झाले, की पुणे जिल्ह्याची राजकीय दृष्ट्या विभागणी झाली. उत्तर पुणे जिल्ह्यात म्हणजे जुन्नर पासून चाकण पर्यंतच्या नगरपंचायती नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा आणि भाजपचा जलवा सुरू झाला, तर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांमध्ये अजितदादांचा जलवा कायम राहिला.
– उत्तर पुणे जिल्ह्यात शिंदेंचा जलवा
नव्याने निर्माण झालेल्या ग्रामीण भागातल्या फुरसुंगी सारख्या नगरपंचायतींमध्ये अजित पवारांनी सुरुवातीला यश मिळविले. पुणे जिल्ह्यातल्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या लोणावळा आणि तळेगाव मध्ये यश मिळविले. पण पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागात अजित पवारांना स्वतःच्या राष्ट्रवादीचे यश टिकवता आले नाही जुन्नर, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अजितदादांच्या राष्ट्रवादी वर मात करून तिथली नगराध्यक्षपदे खेचून आणली, तर आळंदी सासवड सारख्या तीर्थक्षेत्रांच्या गावांमध्ये भाजपने अजितदादांना धक्का दिला. शिरूर मध्ये नगराध्यक्ष अजितदादांचा राष्ट्रवादीचा झाला, पण प्रत्यक्षात नगरपालिकेत भाजपने बहुमत मिळविले, त्यामुळे अजितदादांचे शिरूर मधले यश निर्भेळ राहिले नाही.
त्यामुळे मराठी माध्यमांनी अजितदादांनी पुणे जिल्ह्यात जलवा दाखवल्याची टिमकी कितीही वाजवली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. पुणे जिल्ह्यात राजकीय विभागणी झाली असून उत्तरेतला पुणे जिल्हा अजितदादांच्या हातातून निसटला. तो एकनाथ शिंदे आणि भाजपच्या हातात गेला, तर दक्षिण आणि पश्चिम पुणे जिल्ह्यातच अजितदादांना यश मिळू शकले, ही वस्तुस्थिती या निवडणुकीने समोर आणली. फक्त यातले राजकीय सत्य “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी सांगितले नाही ते दडपले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App