नाशिक : अजितदादांची विरोधकांकडून नव्हे, तर भाजपकडून चोहोबाजूंनी कोंडी; माणिकरावांपासून पार्थ पर्यंत उडाली दांडी!!, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हीच राजकीय अवस्था महाराष्ट्रात दिसून राहिलीय.
माणिकरावांचे झेंगाट अजितदादांच्या गळ्यात
बनावट कागदपत्रांच्या आधारे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद अडचणीत आले. अजित पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जावे लागले. कारण माणिकरावांच्या अटकेची टांगती तलवार फक्त माणिकरावांवर नाहीतर, त्यांच्या मंत्रिपदावर आली. पण मुख्यमंत्र्यांनी माणिकरावांच्या प्रकरणाचे सगळे झेंगट अजितदादांच्या गळ्यात टाकले. त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय काय घ्यायचा, तो तुम्हीच घ्या, असे सांगून टाकले. पण त्यामुळे अजित पवार आणखी अडचणीत आले. माणिकरावांचे मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही तरी त्यांनी माणिकरावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर ठेवले. तिकडे दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी माणिकरावांसंदर्भात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगून अजितदादांची अडचण आणखी वाढविली.
पार्थवर टांगती तलवार
दुसरीकडे पार्थ पवारचा जमीन घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचा पुरावासमोर आल्यानंतर त्याच्यावरही कारवाईची टांगती तलवार आणखी धारदार झाली. ती धार भाजपने बोथट होऊ दिली नाही. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी वेगवेगळे कागदपत्रे “आपोआप” समोर आली. ती माहिती अधिकार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे अजित पवारांची वेगळी कोंडी झाली. माणिकराव कोकाटे यांना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला त्यांना अटक झाली, तर पार्थला दुसरा न्याय लावता येणार नाही. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवावाच लागेल, अशी परिस्थिती भाजपने अजितदादांसमोर वाढून ठेवली.
मलिकांच्या निमित्ताने मुंबईत झटका
तिसरीकडे मुंबईत नवाब मालिकांच्या निमित्ताने भाजपने अजितदादांच्या राष्ट्रवादीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीला मुंबईत महायुतीतून एकटे पाडले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांना एकटे लढायला लावले. तिथे भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करणे टाळले. शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याची कार्यकर्त्यांनी सूचना केली, तरी आमच्या पक्षाने अजून तो निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांना करावा लागला. याचा अर्थ पटेलांनी अजितदादांच्या निर्णयात पाचर मारून ठेवली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाकी
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये दुबळ्या काँग्रेसशी टक्कर घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढविले होते. पण आता भाजपने ती राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तिची दोन शकले केली. मग भले शरद पवारांनी स्वतः अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठविले असेल, पण एका पक्षाचे दोन पक्ष झाले. कार्यकर्ते विभागले गेले, ही वस्तुस्थिती झाकून राहिली नाही.
अशा स्थितीत बळकट भाजपशी स्वबळावर म्हणण्यापेक्षा एकाकी लढाईची वेळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वर आली. किंबहुना ती भाजपने आणली. या सगळ्यात अजितदादांना अडचणीत आणण्यात बाकीच्या विरोधकांचा काहीच राजकीय वाटा नाही. अजितदादांना जे काही अडचणीत आणले, ते भाजपने आपल्या स्वबळाच्या निर्णयाने आणले. भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचणीला जरूर आणून ठेवले. पण दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने त्या सत्तेच्या वळचणीची फार मोठी किंमत अजितदादांना चुकवावी लागण्याची चुणूक दाखवून दिले. माणिकराव कोकाटे, नवाब मलिक आणि पार्थ पवार यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये भाजपने चतुराईने अजित पवारांना कोंडीत आणले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App